मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/04/2026 :
तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा शेती, प्रत्येक ठिकाणी आपल्यातील सेवाभावी वृत्ती गरजेची असते. आपल्याला मिळणारे उत्पन्न किंवा पगार हाच फक्त उद्देश नसावा तर त्यासाठी आपल्यातील माणूसपण सुद्धा जागे ठेवले पाहिजे.
आपण जी नोकरी करतो ती प्रामाणिकपणे केली पाहिजे. सही करणे अन् हजेरी लावणे हा हेतू नसावा. शिक्षकांनी प्रामाणिकपणे संस्कारित विद्यार्थी घडवावेत, डॉक्टरांनी रुग्ण व्यवस्थित कसा बरा होईल ते पहावे. शेतकऱ्यांनी आरोग्याला पोषक असेच धान्य, फळे, भाजीपाला पिकवावा.
थोडक्यात काय प्रत्येकाने प्रामाणिकपणे व नीतिमत्ता पाळून आपापले काम करावे. भ्रष्टाचार तर नकोच पण कामात हलगर्जीपणा सुद्धा करू नये. आपण जेव्हा स्वतःशी प्रामाणिक असतो तेव्हा पडल्या पडल्या झोप लागते.
आजचा संकल्प
आपण दुसऱ्याला कितीही बेमालूमपणे फसवले तरी स्वतःला फसवू शकत नाही. त्यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहू व समाजाप्रती आपली बांधिलकी जपू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या