श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या 148 व्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

 

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या 148 व्या  पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/04/2026 :

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या 148 व्या  पुण्यतिथीनिमित्त बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी संग्रामनगर -  अकलूज येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यानिमित्त मनोहर तुकाराम उगाडे यांचे निवासस्थान श्री समर्थ निवास, साई मार्ग - 1 संग्रामनगर-अकलूज येथे सकाळी 7 वाजता अभिषेक व महापूजा, सकाळी 9:30 ते 11:45 श्री ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ माळीनगर यांचे भजन, 11:45 ते 12 जप व पुष्पवृष्टी, 12 ते 12:30 आरती व महाप्रसाद असा धार्मिक कार्यक्रम असून प्रतिमा पूजन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या