सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची “ॲटमबर्ग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” पुणे येथे निवड

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची “ॲटमबर्ग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” पुणे येथे निवड

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 13/03/2026 :

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या “ॲटमबर्ग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” पुणे या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील इलेक्ट्रीकल डिप्लोमा विभागातील अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या  कु. समृद्धी कुलकर्णी, कु.दिक्षा लोंढे व वैष्णवी आगलावे या विद्यार्थ्यांची “ॲटमबर्ग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” पुणे या नामांकित कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  प्रवीण ढवळे यांनी दिली.

 सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील,  महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. 

या प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रीकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.सागर कांबळे  तसेच प्रा.फुले पी. जी. आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संगीतराव पी. वाय. यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या