मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 23/03/2026 :

आपले आरोग्य खूप महत्वाचे आहे. ते जपणे ही आपल्या प्रत्येकाची महत्वाची जबाबदारी आहे. आरोग्य निरोगी असेल, सुदृढ असेल तर आपण निर्धास्तपणे कोणत्याही क्षेत्रात झोकून देऊन उल्लेखनीय कामगिरी करू शकतो.

याच्या जोडीला मानसिक आरोग्य सुद्धा महत्वाचे आहे. शारीरिक आरोग्य जपण्यासाठी सकस व चौरस आहार घेणे जसे महत्वाचे असते तसे मानसिक आरोग्यासाठी शुद्ध, सकारात्मक, सात्विक विचार महत्वाचे असतात.

आपण शिळे, निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त अन्न आहारात घेत नाही, अगदी तसेच निकृष्ट दर्जाचे, नकारात्मक, द्वेषभावना पसरवणारे विचार सुद्धा आपल्या मनात येऊ देऊ नयेत. त्यामुळे आपले वर्तन बिघडते, चारित्र्य दूषित होते.

आजचा संकल्प

आहाराप्रमाणे शरीरप्रकृती व विचारांप्रमाणे वर्तन संस्कृती दिसून येते. म्हणून सात्विक आहार व सुसंस्कृत विचारप्रणालीचा अवलंब करू व स्वतःला घडवू.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या