विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/03/2026 :
सात दिवसांचा आठवडा, दोन आठवड्याचा पंधरवडा व चार आठवड्याचा महिना. म्हणजेच महिन्यात दोन पंधरवडे असतात. पहिला पंधरवडा म्हणजे शुद्ध पक्ष व दुसरा पंधरवडा म्हणजे कृष्ण पक्ष.
पहिला पंधरवडा संपला की पंधराव्या तिथीला पौर्णिमा असते व दुसरा आठवडा संपला की पंधराव्या तिथीला अमावास्या असते. अमावस्या म्हणजे त्या मराठी महिन्याचा शेवटचा दिवस.
अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी नवीन महिना सुरू होतो. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी व पंधराव्या तिथीला पौर्णिमा. पुन्हा याच क्रमाने चौदा तिथी व तिसाव्या तिथीला अमावास्या येते.
अशा असतात मराठी महिन्याचा तारखा.(तिथी)
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या