विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/03/2026 :
आपले जसे विचार असतात तशी आपल्याला समोरची माणसे दिसतात. आपली जशी दृष्टी असते तशी आपल्याला सृष्टी दिसते. प्रमाण कमी-जास्त असेल पण प्रत्येकाच्यात चांगले-वाईट गुण असतात.
दगडात मूर्ती लपलेली असते, कोळश्यात हिरा सापडतो. तसे गुलाब फुलांचा राजा असला तरी त्याला काटे असतात. अनेक फुलांमध्ये किडे-मुंग्या असतात. त्यामुळे फुलांचे महत्व कमी होत नाही.
आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, आपले मित्र चांगले असावेत असे वाटत असेल तर अगोदर स्वतः विचारांनी चांगले व्हा. समोर व्यक्ती असो वा वस्तू त्यातील चांगले पहा.
आपण प्रत्येकजण चांगले गुण पाहण्याची व आत्मसात करण्याची सवय लावून घेऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या