मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/03/2026 :
आज जागतिक जल दिन जगामध्ये पाणी ही समस्या झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे मर्यादित स्रोत असल्याने ते जपून वापरणे अत्यंत गरजेचे आहे.
जपून वापरणे दोन अर्थी. एक प्रत्येक थेंब महत्वाचा समजून काटकसरीने पाणी वापरणे, पाण्याचा पुनर्वापर करणे व दोन पाणी खराब होऊ न देणे.
त्यासाठी आपण स्वतःवर काही बंधने घातली पाहिजेत. सांडपाणी चांगल्या पाण्यात मिसळणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. निर्माल्यापासून नको असणाऱ्या वस्तूंपर्यंत आपण जे पाण्यात अर्पण करतो ती सवय अगोदर बदलली पाहिजे.
आजचा संकल्प
आपण प्रत्येकजण वैयक्तिक पातळीवर जल प्रदूषण रोखण्यासाठी स्वतःला शिस्त लावू. पाणी आहे तर सजीवांचे जीवन आहे हे लक्षात घेऊ अमृतासमान पाणी मृत होणार नाही याची काळजी घेऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या