विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/03/2026 : कोणाच्या यशाने आपण प्रेरणा घेतली पाहिजे. मोकळ्या मनाने त्यांच्या यशाचे कौतुक केले पाहिजे. त्यामागील प्रयत्न विचारात घेतले पाहिजेत व आपणही त्याप्रकारे प्रयत्नशील राहिले पाहिजे.
अनेकदा अनुभव उलटा येतो. एखाद्याचे यश डोळ्यात खुपते. ते कसे वशिल्याने मिळाले, कशी लबाडी केली या पुस्ती जोडल्या जातात. प्रत्येक यश असेच असते असे नाही.
मुलांनो, आपला दृष्टिकोन साफ ठेवा, सकारात्मक रहा, त्यामधून काहीतरी शिका, प्रेरणा घ्या. त्यांचे अनुभव विचारात घ्या. आपण मनापासून प्रयत्न करा. दुसऱ्याचे अहित चिंतन्याने कोणाचेच भले होत नाही.
आपले सकारात्मक विचार, कृती व शुभचिंतन आपल्याला यशस्वी करेल.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या