ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य चा "महाराष्ट्र भूषण पुरस्कार" वितरण व "ॲम्बुलन्स लोकार्पण" सोहळा

 ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य चा  "महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण व "ॲम्बुलन्स लोकार्पण" सोहळा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 07/03/2026 :

ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने "महाराष्ट्र भूषण पुरस्कार" वितरण आणि लोकवर्गणीतून "ॲम्बुलन्स लोकार्पण" सोहळा बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता मोहोळ येथील शहाजीराव पाटील सभागृह येथे आयोजित केल्याची माहिती संस्थापक प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड यांनी अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता ला दिली.

आदर्श माता, आदर्श पिता, कृषीनिष्ठ, शिक्षण, आरोग्य, समाजसेवक, अधिकारी, सांस्कृतिक, पत्रकार, बचत गट, खेळाडू, अधिकारी, कामगार, व्यावसायिक, साहित्यिक इत्यादी विभागास राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी 94 22 35 13 34, किंवा 98 50 10 33 99 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष कोल्हाळ यांनी केले आहे. 

    "आमचे सहकारी मित्र तानाजीराव गुंड हे संस्थापक प्रदेश अध्यक्ष असलेली ग्राहक  समिती महाराष्ट्र राज्य ही स्थापनेपासूनच समाज उपयोगी आदर्श उपक्रम राबवून विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसरपणे कार्यरत आहे. विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्या मध्ये या समितीचा सिंहाचा वाटा असल्याचा नावलौकिक या संस्थेने कमावलेला आहे." अशी प्रतिक्रिया नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड एस सी एस टी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी. चे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धीप्रमुख, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी व्यक्त केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या