विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 05/03/2026 :
आपल्याला आपले आई-वडील, गुरुजन छान गोष्टी सांगून संस्कारित करत असतात. चांगली कृती म्हणजे पुण्य व वाईट कृती म्हणजे पाप हे पटवून देतात. खोटे बोलणे हे पाप आहे व बाप्पा कान कापतो हे आपण सर्वांनी लहानपणी ऐकलेले आहे.
त्याचा हेतू हाच असतो की भीतीमुळे का होईना तुम्ही खोटे बोलणार नाही. खरे बोलाल. आता मोठे झाल्यावर तुम्हाला या गोष्टीचे हसू येईल पण अयोग्य काम करणे चुकीचेच आहे हे नक्की.
मुलांनो, इतरांना आनंद द्या, त्यांना सहकार्य करा, मदत करा. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवा. हिच पुण्याची कामे. पुण्य म्हणजे वेगळे काही नसून आपल्या कृतीमुळे इतरांना झालेले समाधान होय.
पुण्याची इतकी साधी व्याख्या लक्षात घ्या व आपल्या वर्तनात बदल करा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या