मादक पदार्थांचा आरोग्यावर दुष्परिणाम जनजागृती कार्यक्रम संपन्न.
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/03/2026 :
तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रम व मादक पदार्थांचा मानवी आरोग्यावर दुष्परिणामाबाबत जनजागृती कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली नंबर ३ व मुले नंबर २ गणेशनगर अकलूज येथे संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा.धनंजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना व्यसन व त्याचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.
सध्या विद्यार्थ्यांमध्ये चालू असलेले व्यसन म्हणजे कोको कोला, स्टिंग, थम्सअप या थंडगार पेयामुळे लहान वयातच मुलांच्या शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे प्राध्यापक देशमुख यांनी उदाहरणांसह सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते समजण्यास सोपे झाले तसेच ते सर्पमित्र असल्यामुळे विविध विषारी आणि बिनविषारी सापांची त्यांनी माहिती मुलांना सांगितली व मुलामुलींना शालेय जीवनात व पुढील आयुष्यामध्ये कोणतीही व्यसन न करण्याची शपथ प्रा. देशमुख यांनी दिली. यावेळी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अमित घाडगे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा.भारती भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी व्यसनांचे दुष्परिणाम या विषयांवर पथनाट्य सादरीकरण केले. या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर २ च्या मुख्याध्यापिका श्रीमती सुकुमारी अंगुले, श्रीमती. मनीषा बळवंतराव, श्रीमती अंजली अडाणे, तय्यब शेख,फातिमा मुलाणी,हाजराबी बांगी तसेच, महादेव नागणे,रेखा कोळी,पांडुरंग मोहिते,सुरैय्या कोरबू आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली नंबर ३ चे मुख्याध्यापक दत्तात्रय कोरे यांनी तर सुत्रसंचलन दत्तात्रय गायकवाड आणि आभार श्रीकांत राऊत यांनी मानले.

0 टिप्पण्या