संजय अशोक नवले यांचे अपघाती निधन

 

संजय अशोक नवले यांचे अपघाती निधन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 31/03/2026 :

नवचारी - संग्रामनगर - बागेचीवाडी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील रहिवासी संजय अशोक नवले (वय  52 वर्षे) यांचे सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी दुपारी पुणे येथे औषधोपचार सुरू असताना निधन झाले. त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, असा परिवार आहे. 

शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी  रात्री अकलूज गिरझणी रस्त्यावर जगताप यांचे किराणा दुकानासमोर मोटर सायकलने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन ते बेशुद्ध झाले होते. जवळच असलेल्या क्रिटिकेयर आय सी यु सेंटरमध्ये त्यांना दाखल केले होते. मध्यरात्री पर्यंत शुद्धीवर न आल्याने रात्री दोन वाजण्याच्या सुमारास  त्यांना  पुढील उपचारासाठी पुण्यास हलविले. मात्र सोमवारी दुपारी त्यांनी पुणे येथील रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी सकाळी पुणे येथून त्यांचे पार्थिव नवचारी येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अकलूज येथील अकलाई वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर  अंतिम दाहसंस्कार करण्यात आले.

कै. संजय अशोक नवले यांच्या अकस्मात अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संग्रामनगर - अकलूज येथे सुप्रसिद्ध "बाजार आमटी" चा स्वतःचा व्यवसाय त्यांनी अल्पावधीतच नावारुपास आणलेला आहे.

कै. संजय अशोक नवले यांच्या अस्थी सावडण्याचा विधी बुधवार दिनांक 1 एप्रिल 20 26 रोजी सकाळी सात वाजता अकलाई वैकुंठ स्मशानभूमी अकलूज येथे होईल अशी माहिती मयताचे बंधू गणेश अशोक नवले यांनी सांगितली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या