खरात 卐 सरक शुभविवाह संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/03/2026 :
कै. मथुरा व कै. मल्हारी लक्ष्मण खरात यांचे नातू व सौ सुषमा व ज्ञानेश्वर मल्हारी खरात राहणार बिजवडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांचे द्वितीय चिरंजीव मयूराज आणि सौ.चांगुणा व नारायण यशवंत सरक यांची नात व सौ कल्पना व मनेष नारायण सरक राहणार यशवंतनगर अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची जेष्ठ कन्या चि. सौ. का. धनश्री यांचा शुभविवाह शनिवार दिनांक 07/03/ 2026 रोजी दुपारी 12 वा. 48 मि. या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला. याप्रसंगी आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वयंवर मंगल कार्यालय, पंचवटी, अकलूज - माळीनगर रोड, तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर येथे संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यास सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभाशिर्वाद दिले.
0 टिप्पण्या