गॅस दरवाढ मागे घेण्याबाबत माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तहसील कचेरी माळशिरस येथे निवेदन

 


गॅस दरवाढ मागे घेण्याबाबत माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तहसील कचेरी माळशिरस येथे निवेदन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 12/03/2026 :

केंद्र सरकारने अचानक केलेली गॅस दरवाढ मागे घेण्याबाबत माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तहसील कचेरी माळशिरस येथे निवेदन देण्यात आले.

गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी सकाळी येथे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रभारी तहसीलदार अमोल कदम  यांनी निवेदनाचा स्वीकार केला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आप्पासाहेब मगर,राजीव गांधी पंचायत राज्य संघटन विभागाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रमेश अंकुश नामदास, किशोरराजे दादासाहेब गाडे, भरतराव मारुती रुपनवर, ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 केंद्र शासनाने अचानक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ६० रुपये अशी मोठी वाढ केली असून गॅस सिलेंडरची नोंदणीचा कालावधी सुध्दा वाढविलेला आहे. "अच्छे दिन"चे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाने मोठ्या प्रमाणात गॅस दरवाढ करून जनतेचा विश्वासघात केलेला आहे. असे  निवेदनाच्या आरंभी नमूद केलेले आहे. काँग्रेसने दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आलेले आहे की, व्यावसायिक सिलेंडर ही गेल्या आठवड्याभरात १५० रुपयांनी महाग झालेला आहे. 

केंद्र शासनाच्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलेंडर महाग झाल्याने आता सिलेंडर साठी ९२० रुपये पैक्षाही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.असा महाग झालेला गॅस सिलेंडर विकत घेणे हे सर्वसामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरचे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ गोरगरीब जनतेवर आली आहे. केंद्र सरकारने ही अचानक केलेली गॅस दरवाढ त्वरित मागे घ्यावी.अन्यथा काँग्रेस पक्षासह लोक रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाहीत. असे शेवटी निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या