ह्या नराधमाला शिक्षाही भेटलीच पाहिजे

ह्या नराधमाला शिक्षाही भेटलीच पाहिजे

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 25/03/2026 :

ह्या नराधमाला शिक्षाही भेटलीच पाहिजे. हा खरात बुवा, याला आता राजकीय प्रोटेक्शन असणार, कारण याच्याकडे एवढी ५०० कोटींची संपत्ती आहे आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न राजकारणातले मोठमोठे नेते नक्कीच करणार. आणि हा बेलवरती सुटणार. आणि त्यांना साथ देणारी ती चाकणकर, हिला सुद्धा शिक्षा मिळणं तितकंच गरजेचं आहे. या बाईने किती बायकांना त्या खरातच्या मागे लावून त्यांचं आयुष्य उध्वस्त केलेलं आहे. देव जाणे.राजकीय नेत्यांचं त्याच्याशी घनिष्ट संबंध असल्यामुळे राजकारणातले मोठमोठे नेते त्याला बेल मिळवून देतील.

अशा नराधमांना वेळीच शिक्षा मिळाली नाही तर आज या समाजामध्ये बुवाबाजी, भोंदूगिरी वाढेल आणि समाज हा अंधश्रद्धेच्या खाईत पूर्णपणे गुंतून जाईल. विशेषतः आपल्या महिला मंडळ या जास्त करून अशा बुवाबाजी, ढोंगी बाबांच्या मागे लागतात. या चाकणकर बाईला तर शिक्षा भेटलीच पाहिजे आणि शिक्षा मिळण्यासाठी समाजातील सर्व स्तरातून आवाज उठवणे गरजेचे आहे. ते खरातसारख्या भोंदूंना वेळीच जर शिक्षा मिळाली नाही तर आणखी असे भोंदू बुवा जन्माला येतील आणि या समाजामध्ये अधर्म माजवतील. आणि या अधर्मामुळे समाज हा वाममार्गाला जाईल.

आपल्याला खरंच इच्छा असेल आपला समाज चांगल्या मार्गाला जावा, तर समाजातील प्रत्येक संघटनेने एकत्र येऊन याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कारण ह्यामध्ये बायकांचं शोषण जास्त होतं, गोरगरिबांचा पैसा लुबाडला जातो आणि धर्माच्या नावाखाली अनैतिक व्यवहार केले जातात. आणि त्या अनैतिक व्यवहारामुळे आज समाजामध्ये वेगळीच धर्माची बुरसटलेली प्रवृत्ती पसरली जाते. त्यामुळे आता समाजाने जागृत होणं फार गरजेचं आहे. आणि या खरातसारख्या नराधमांना वेळीच शिक्षा मिळणं त्याहून गरजेचं आहे.

राजकारणातल्या लोकांनी अशा भोंदूंना जर संरक्षण दिलं तर या समाजाची खूप हानी होणार. त्या भोंदू बुवांना तर शिक्षा मिळणे गरजेचे आहे, पण त्याबरोबर त्यांचे जे शिष्य आहेत, ज्यांनी त्यांची इतकी प्रसिद्धी केली आहे, त्यांनाही थोडाफार मार बसणे गरजेचे आहे. तरच हा अनैतिक व्यवहार आणि हा माजलेला अधर्म कमी होईल.

शब्दांकन : लेखिका तृप्ती पाटील ✍️✍️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या