विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 08/03/2026 :
शालेय जीवनातील स्पर्धा व परीक्षा आपल्याला सक्षम करतात. जिंकण्याच्या अपेक्षेने आपण भरपूर तयारी करतो. ईर्षेने प्रतिस्पर्ध्यांना हरवतो व जिंकण्याचा आनंद घेतो.
जीवनात अशा अनेक प्रतिस्पर्ध्यांना हरवण्यासाठी आपण तयारीत असतो. कधी जिंकतो, कधी हरतो. हरलो तर जिंकण्यासाठी प्रयत्न करतो.
मुलांनो, स्पर्धा जिंकणे एक वेळ सोपे पण दुसऱ्यांची मने जिंकता आली पाहिजेत. त्या दृष्टीने स्वभावात बदल करा. सकारात्मकता वाढवा. संस्कारांना जास्त महत्व द्या. नीतिमत्तेने वागा.
एखादी स्पर्धा हरलात तरी चालेल पण समोरच्या व्यक्तीच्या मनातून उतरू नका.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या