विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 23/03/2026 :

शहीद दिवस,२३ मार्च हा दिवस आपल्या भारतात शहीद दिन (हुतात्मा दिन) म्हणून पाळला जातो. १९३१ मध्ये याच दिवशी थोर क्रांतिकारक भगत सिंह, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना लाहोर तुरुंगात ब्रिटिशांनी फाशी दिली होती. या वीरपुत्रांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस देशभरात पाळला जातो.

लाला लजपत राय यांच्या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या ब्रिटिश पोलिस अधिकारी जॉन सॉन्डर्स याच्या वधात सहभागी असल्याबद्दल त्यांना फाशी देण्यात आली. वयाच्या अवघ्या २४-२५ व्या वर्षी मातृभूमीच्या स्वातंत्र्य आणि सन्मानासाठी या तरुणांनी अगदी हसत हसत सर्वोच्च बलिदान दिले.

सॉन्डर्सच्या वधानंतर तुरुंगात असताना भगतसिंह यांनी लिहिलेले अनमोल विचार आजही प्रेरणादायी आहेत. क्रांती म्हणजे केवळ शत्रसंघर्ष आणि रक्तपात नव्हे, तर ते सामाजिक आणि वैचारिक पुनरुत्थान आहे असे त्यांचे ठाम मत होते.

चित्रपट आणि कथा यात रेखाटलेल्या थोर लोकांच्या प्रतिमांमध्ये न अडकता त्यांचे विचार समजावून घेऊ, देश घडवू!

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या