मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 24/03/2026 :

जीवनात पैसा जसा महत्वाचा आहे तसा परमार्थही महत्वाचा आहे. जीवन जगण्यासाठी पैसे लागतात. पैशाशिवाय काहीच होत नाही. तरीसुद्धा पैसा म्हणजे सर्व काही नाही.

परमार्थ करावा, पोथी-पुराणे वाचून परमार्थ करण्यापेक्षा गरजूंना योग्य मदत सहकार्य करून केलेला परमार्थ सत्कारणी लागतो. पुण्य कमावण्याचा विषय डोक्यात ठेवून परमार्थ करू नये. कर्म करत रहावे, फळ मिळायचे तेंव्हा मिळते.

पाप-पुण्य म्हणजे काय याची चर्चा करण्यापेक्षा जी कृती करताना ज्याच्यासाठी करतो त्याला व आपल्याला आनंद व समाधान मिळत असेल तर ती कृती नक्की करावी.

आजचा संकल्प

कोणाचे मन न दुखावता धीर देणारे चार शब्द जरी त्या व्यक्तीशी बोललो तरी ते प्रार्थनेसमान असतात हे लक्षात ठेवू व पैशापेक्षा परमार्थाला महत्त्व देऊ._

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या