"राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने" पुरुषोत्तम बैसकार सन्मानित
वृत्त एकसत्ता न्यूज
यवतमाळ दि. 29/03/2026
व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात निष्ठेने केलेल्या अमूल्य कार्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागला आहे. पुरुषोत्तम बैसकार यांच्या अतुलनीय, निस्वार्थी सेवाभावाची यथोचित दखल घेत, महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना सन 2023-2024 चा "राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार" डाँ. हर्षदीप कांबळे (समाजकल्याण आयुक्त) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई यांचेकडून प्रदान करून गौरविण्यात आले. मंचावर संजय शिरसाठ सामाजिक न्यायमंत्री, रामदास आठवले, सत्यपाल तसेच ईतर मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या