साकेत जगदीश गायकवाडचे
पदवी गेट परीक्षेत यश
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/03/2026 :
आय.आय.टी. (भारतीय तंत्रज्ञान संस्था) गुवाहाटी यांनी घेतलेल्या पदवी गेट परीक्षा 2026 मध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च पदवि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रीकल विभागातील) शिकत असणारा विद्यार्थी साकेत जगदीश गायकवाड याने घवघवीत यश संपादन केले असल्याचे माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी दिली.
महाविद्यालयाचे ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच इलेक्ट्रीकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुरज शिंदे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या