मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 04/03/2026 :

आपल्या भावना व्यक्त करणे ही सुद्धा एक कला आहे. आपले म्हणणे मांडता आले पाहिजे. विषयाला धरून मुद्देसूद बोलता आले पाहिजे. वक्तृत्व ही कला सर्वांनाच जमते असे नाही पण चार माणसात व्यवस्थित बोलता आले पाहिजे हे नक्की.

आपला विषय, मत दुसऱ्याला समजाऊन सांगता आले पाहिजे तसे दुसऱ्याचे मत सुद्धा समजून घेता आले पाहिजे. दुसऱ्याचे मन समजले तर त्याची मते समजायला वेळ लागत नाही.

समोरच्या व्यक्तीचे सुख-दुःख, आनंद, चीड-राग, संताप या भावना लक्षात आल्या की आपण त्याला योग्य प्रतिसाद देणे अपेक्षा असते. अशावेळेस व्यक्त होणे खूप गरजेचे असते अन्यथा घुसमट होते.

आजचा संकल्प

प्रत्येकाने आपापल्या भावना मांडल्या पाहिजेत तसाच इतरांना प्रतिसाद पण दिला पाहिजे हे लक्षात घेऊ व भावनांचा कोंडमारा न करता व्यक्त होऊ व सुसंवाद साधू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या