नायकुडे 卐 नरुटे शुभविवाह संपन्न

 नायकुडे 卐 नरुटे शुभविवाह संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 05/03/2026 :

सौ साधना व राजकुमार लक्ष्मण नायकुडे राहणार नायकुडे वस्ती, मायाक्का कॉलनी, संग्रामनगर- अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची जेष्ठ कन्या चि. सौ. का. तेजस्विनी ( प्राजक्ता) आणि श्रीमती नमिता व कै. महादेव सोपान नरुटे राहणार पिंपरी खुर्द, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांचे द्वितीय चिरंजीव विवेक यांचा शुभविवाह गुरुवार दिनांक 5/3/ 2026 रोजी दुपारी 1 वा. 35 मि. या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला.

साई गोल्डन इव्हेंट्स इंदापूर (कालठण नंबर 2 रोड) तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या