मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/03/2026 :

घराची, परिसराची स्वच्छता गरजेची असते. नको असलेले, खराब झालेले अडगळीचे साहित्य आपण टाकून देतो. जितके गरजेचे आहे, पाहिजे तेव्हढेच साहित्य आपण ठेवतो. अशाच प्रकारे अंगण, परिसर, गल्ली स्वच्छ ठेवतो.

ही झाली बाह्य स्वच्छता. अंतर्गत स्वच्छतेची, मनाच्या स्वच्छतेची पण तशीच गरज असते. नको असतील ते नकारात्मक विचार वेळीच मनातून बाहेर काढणे खूप गरजेचे असते.

यासाठी नको त्या विचारांचा निचरा झाला पाहिजे. सद्विचार मनात रुजले की नकारात्मक विचार बाहेर पडतात. परस्परांमध्ये हेवे-दावे न ठेवता मनही मोकळे केले पाहिजे.

आजचा संकल्प

_कोणाबद्दल मनात राग किंवा आकस न ठेवता आपल्या भावना व्यक्त करू. मनात अढी न ठेवता एकमेकांशी संवाद साधू व स्वच्छ मनाने परस्पर संबंध जोपासू._

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या