माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या हस्ते भरतराव मारुती रुपनवर यांचा सत्कार
वृत्त एकसत्ता न्यूज
नातेपुते प्रतिनिधी दिनांक 17/03/2026 :
माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी भरतराव मारुती रुपनवर (मु.पो.कुरबावी) यांची तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी नियुक्ती केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी भरतराव रुपनवर यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते मारुतराव शंकरराव पाटील ज्येष्ठ नेते, पोलीस पाटील नाथा पाटील, सागर पाटील उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शनपर बोलत असताना तालुकाध्यक्ष गिरीश शेटे हे कष्टाळू , प्रामाणिक, तळमळीने, निष्ठेने काम करणारे अध्यक्ष लाभलेले आहेत. निश्चितपणाने माळशिरस तालुक्यामध्ये काँग्रेस पार्टी येणाऱ्या काळामध्ये सर्वात प्रभावशाली वैचारिक मूळ विचारधारा असणारी पार्टी आपल्याला भविष्यात निश्चितपणाने पाहायला मिळेल हा विश्वास माजी आमदार रुपनवर यांनी व्यक्त केला.

0 टिप्पण्या