ताकत एका मताची !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 02/03/2026 :
वर्षानुवर्षे लोकांनी दुबई आणि काही श्रीमंत अरब देशांकडे आदर्श म्हणून पाहिलं. करमुक्त अर्थव्यवस्था, प्रचंड उंच इमारती, आधुनिक शहरं आणि सुरक्षित देश अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. पण जेव्हा प्रत्यक्ष संघर्षाची वेळ आली, तेव्हा विकास, पैसा आणि गगनचुंबी इमारती काहीच उपयोगी पडल्या नाहीत. क्षेपणास्त्रांसमोर ही चमकधमक अपुरी ठरली.
दुसरीकडे भारताकडे पाहिलं, तर चित्र वेगळं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या काळात पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि हल्ल्यांचे 600+ प्रयत्न झाले पण भारताच्या संरक्षण व्यवस्थेने एकही धोका यशस्वी होऊ दिला नाही. प्रत्येक हल्ला हवेतच रोखला गेला. एकही क्षेपणास्त्र भारतीय भूमीवर पोहोचू शकले नाही. हे केवळ ताकदीचं नाही, तर शिस्तबद्ध तयारीचं उदाहरण आहे.
सीमेपलीकडे सायरन वाजत होते, भीतीचं वातावरण होतं. पण भारतात मात्र लोक आत्मविश्वासाने वावरत होते. कारण देश सुरक्षित हातात आहे, ही भावना लोकांच्या मनात होती. हीच खरी सुरक्षितता असते. फक्त श्रीमंतीची, इमारतींची किंवा झगमगाटाची नव्हे, तर प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक इंचाची सुरक्षा!
140 कोटी लोकांचं आयुष्य सुरक्षित ठेवणारं कवच उभं करणं ही पण राष्ट्रनिर्मिती आहे. भाजप सरकार देशात सत्तेवर आहे म्हणून भारत आज फक्त विकसित होत नाही, तर सुरक्षितही होत आहे. हीच खरी मजबूत राष्ट्राची ओळख आहे. तुमच्या एका मतामध्ये एवढी ताकत असते.
जय हिंद! 🇮🇳
रूपाली म्हात्रे.

0 टिप्पण्या