मनाची शुध्दता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 08/03/2026 :
8 मार्च जागतिक महिला दिन. महिलांना योग्य न्याय, योग्य वेतन, आवश्यक त्या रजा अशा बऱ्याच बाबतीत महिलांच्या बाजूने कायदे केले गेले. ८ मार्च हा सर्वत्र महिला दिन म्हणून साजरा होतो.
ज्या समाजात पुरुषप्रधान संस्कृती असते तिथे पुरुषांचे वर्चस्व असते. महिलांना दुय्यम किंवा कनिष्ठ स्थान असते. अशा वेळेस महिला दिन साजरा करून महिलांच्या समस्यांचा विचार केला जातो. काही मार्ग शोधले जातात.
हे प्रश्न एक दिवस साजरा करून सुटणार नाही. कायमस्वरूपी मानसिकता बदलून स्त्रीला समान दर्जा देऊन ती सुद्धा माणूस आहे हे मनापासून मान्य केले पाहिजे.
आजचा संकल्प
महिलांना एक दिवसापुरता सन्मानित न करता तिच्या माणूसपणाची, त्यागाची, कष्टाची दखल घेऊ व तिचे हक्क तिला बहाल करू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या