विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 01/03/2026 :
शालेय जीवनात आपल्याला विचारांची परिपक्वता नसते. एकमेकांशी कसे वागावे कसे बोलावे याचे इतके ज्ञान नसते. इतर मित्र वागतात, मजा करतात तसे करावेसे वाटते. कोणाची टर उडवावी, कोणाची फजिती कराविशी वाटते.
हलकी-फुलकी मजा ठीक पण कोणाच्या मनाला लागेल असे बोलू नये. जिव्हारी लागेल असा अपमान करू नये. आपण जे करतो त्याची किंमत आपल्याला मोजावीच लागते हे लक्षात घेतले पाहिजे.
आपण जसे कर्म करू तसे फळ मिळतेच. हे जर नक्की आहे तर इतरांशी चांगले वागणे, चांगले बोलणे त्यांना आनंद देणे हे जर आपण केले तर आपल्याला पण परतून इतरांच्याकडून या गोष्टी मिळतात. चांगले कर्म करत रहा. न मागता चांगले अनुभव येतील.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या