विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/03/2026 :
सध्या तुम्ही विद्यार्थी आहात म्हणजे तुमच्यापुढे प्रश्न असतील ते अभ्यासातले, समस्या असतील त्या अभ्यासक्रमातील. त्याची उत्तरे तुम्हाला पुस्तकातच सापडतील. नाही सापडली तर मित्र, शिक्षक तुम्हाला शोधून देतील.
पण आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांचे ना पुस्तक असते ना अभ्यासक्रम. त्याची उत्तरे अशी कुठे छापलेली सापडत नाहीत. आपल्याला ती अनुभवातून शोधावी लागतात. त्यासाठी स्वतःच प्रयत्नशील रहावे लागते.
मुलांनो, म्हणून या वयात नुसता पुस्तकी अभ्यास न करता सभोवताली काय चालू आहे त्याचे निरीक्षण करा. आपले आई-वडील, इतर मोठे लोक समस्यांच्या पुढे हतबल होत नाहीत तर त्यावर मात कशी करतात याचे निरक्षण करा.
उघड्या डोळ्यांनी समोरचे जग बघा, माणसे वाचा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या