कुरघोडीचं राजकारण ; संघर्ष संपेल काय?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/03/2026 :
कुरघोडीचं राजकारण. ज्याला कान भरणे असंही म्हणतात. कुरघोडी करणे ही एक सवय आहे काही लोकांची. त्यांना कितीही समजावून सांगीतलं तरी त्यांच्या कुरघोड्या सुरुच असतात. ज्यातून नुकसान होत असते. अशी कुरघोडी करणे हा आज अस्तित्वात आलेला प्रकार नाही. याला ऐतिहासिक जोड आहे.
त्रेतायुगात घडलेला एक कुरघोडीचा प्रकार जगजाहीर आहे. त्रेतायुगात चांगला संसार चाललेल्या रामराज्यात राम राजा बनू नये त, भरताला राज्य मिळावं. अशी अपेक्षा असणारी दासी मंथरा. जी कैकेयीची दासी होती. तिला काय मिळणार होतं? काहीच नाही. तरीही तिनं महाराणी कैकेयीशी कुरघोडीचं राजकारण केलं नव्हे तर रामराज्याच्या चांगल्या सुरळीत राज्यकारभारात आग लावली. ज्यातून रामाला चौदा वर्षाचा वनवास झाला व भरतही राजा बनू शकला नाही. या प्रकरणात चौदा वर्ष वनवास भोगणारा राम. ज्याच्यासोबत सीता गेल्यानं सीतेलाही अनन्वीत यातना सहन कराव्या लागल्या चौदा वर्ष. लक्ष्मणालाही चौदा वर्ष त्रासच सहन करावा लागला. म्हणतात की तो चौदा वर्ष जेवलाही नाही आणि चौदा वर्ष झोपलाही नाही. त्यातच राजा दशरथालाही अकाली मरण पत्करावं लागलं. माता कौशल्या व माता सुमित्राच्याही जीवनात वैधव्याचं जीवन आलं. शिवाय कैकेयीला काय मिळालं? तिलाही क्लेष व तिरस्कारच मिळाला आणि तो क्लेष व तिरस्कार आजही टिकून आहे. त्यावेळेस भरतानं राज्य केलं. परंतु राजसिंहासनावर न बसता. केवळ एक संन्यस्त जीवन स्विकारुन त्यानं अयोध्येचं राज्य केलं चौदा वर्षपर्यंत. हेच कुरघोडीचं राजकारण. चौदा वर्षपर्यंत त्याची वाईट फळं, जी दुःखदायक स्वरुपाची होती. ती मिळाली. आजही तो काळ आठवला की विचार येतो. आता कोणी रामराज्यच मानत नाहीत. ही शोकांतिकाच आहे. हा भाग कुरघोडीच्या राजकारणावर पडदा टाकण्यासारखाच आहे. मंथरेला काय मिळालं? तिही त्याच आगीमध्ये जीवनभर तडपत राहिली.
दुसरं कुरघोडीचं राजकारण घडलं द्वापर युगात. द्वापर युगात शकुनीनं सतत आपल्या भाच्याचा म्हणजे दुर्योधनाचा पक्ष घेतला व कुरघोडीचं राजकारण केलं. ज्यातून दुर्योधनाच्या मनात बालपणापासूनच पांडवांबद्दल विषच पेरलं गेलं. ज्यातून पांडवांना सतत त्रास सहन करावा लागला. त्याचा परिणाम हा झाला की कौरव, पांडव हे एकमेकांचे भाऊ भाऊ असले तरी आपापसात लढले. त्यातच त्यांचे आप्त, मित्र, गुरुही आपापसात लढले व मरण पावले. शकुनीला काय मिळालं. तोही या आगीमध्ये समाप्त झाला.
कुरघोडीचं राजकारण हे केवळ युगायुगात झालं व ते समाप्त झालं असं नाही. तर ते वर्तमानकाळातही सुरुच राहिलं. राजा दाहिरला संपवून आपण सत्तेवर येवू असा विचार करणाऱ्या बुद्धभुषणने मोहम्मद बिन कासीमचे कान भरले राजा दाहिरच्या विरोधात. ज्यातून राजा दाहिर मारले गेले. बुद्धभुषणला काय मिळालं? त्याचीही तद्नंतर हत्या केली मोहम्मद बिन कासीमनं. हाच इतिहास पुढं पृथ्वीराज चव्हाणच्या काळात दोहरावल्या गेला. पृथ्वीराज चव्हाणचीही राजा बनण्याच्या नादात राजा जयचंदानं मोहम्मद घोरीला सांगीतलं. ज्यातून पृथ्वीराज चव्हाण पराभूत होताच मोहम्मद घोरी भारतात सत्ताधीश बनला. बदल्यात जयचंदाला काय मिळालं? त्याचीही हत्या केल्या गेली. हेच घडलं चितोडचे महाराज रतनसिंगच्या काळात. देशनिकालाचा करार मिळाल्यानंतर देश सोडून जाणाऱ्या राघवने अलाउद्दीन खिलजीजवळ रतनसिंगची महाराणी पद्यावतीची माहिती दिली..म्हटलं की जगात तिच्याएवढी कोणीच सुंदर नाही. मग काय, अलाउद्दीन खिलजीनं धोक्यानं महाराज रतनसिंगाची हत्या केली आणि महाराणी पद्यावतीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जोहार पद्धतीनुसार तिनं आपलं आयुष्यच समाप्त करुन टाकलं. बदल्यात राघवला काय मिळालं? त्याचीही अलाउद्दीननं हत्या केली. तसंच घडलं महाराज संभाजीच्या कारकिर्दीत. महाराज संभाजीचीही कुरघोडी त्याचेच मेव्हणे गणोजी शिर्के यांनी औरंगजेबाजवळ केली आणि महाराज संभाजी मारले गेले. बदल्यात गणोजीला काय मिळालं? त्याचीही पुढे हत्या झाली.
बदला आणि बदल्याच्या भावनेनं कुरघोडी. काही ठिकाणी राज्य मिळविण्याच्या भावनेनं कुरघोडी. 'मी नाही तर तुही नको.' 'मलाच राज्य मिळायला हवं.' काही ठिकाणी आपलं उल्लू सरळ ठेवण्याच्या भावनेनं कुरघोडी. अशाच कुरघोडीच्या राजकारणात निष्पाप असलेल्या पद्यावतीसह कितीतरी महाराण्या नव्हे तर प्रजेचा जीव गेला. कितीतरी संयोगीता मारल्या गेल्या आणि कितीतरी दाहिर आणि संभाजी मारले गेले. तरीही कुरघोड्याची पद्धत बंद झाली नाही. ती आजही सुरुच आहे. फक्त त्या शब्दानं आता एक नाव धारण केलं. ते म्हणजे निंदा. म्हणतात की निंदकांचं घर असावं शेजारी. कारण बऱ्याच लोकांनाच नाही तर सर्वांनाच एकमेकांच्या निंदा करण्याची सवय असते. लोकं आपलं घर पाहात नाहीत. आपल्या घरातील अंधार पाहात नाहीत आणि दुसर्याच्या घरातील अंधार बघतात. सध्या सुरु असलेलं इराण व इजराईलचं युद्धही याच प्रकारचं आहे.
अमेरिका हा बलाढ्य देश आहे. ब्रिटनमधील काही उद्योजकांनी एकत्र येवून अमेरिका वसवला व त्याच अमेरिकेतील उद्योगपतींनी आता इजराईल. त्याला वाटते की आपली जगावर सत्ता असावी. त्याच हेतूनं अमेरिकेनं इजराईल निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला व जगभरातील विखूरलेले लोकं आपल्याच भुभागाच्या लगत इराणच्या सीमेच्या लगत आणून बसवले. विचार होता, इराणसह इतर लहान लहान देशावर आपला ताबा ठेवणं. आपल्या देशात निर्माण झालेला माल इतर देशांना विकणं. जगभरातील लोकांच्या व्यवहाराची विनिमय पद्धत ही डॉलरमध्ये ठेवणं. रुपया कमजोर करणं. त्यातच जेव्हा इजराईल वसला. तेव्हा त्याला सर्वतोपरीने अमेरिकेने मदत करायचं ठरवलं आणि केलीही. अशातच तात्कालिक कारण घडलं गाजाचा भाग.
गाजा भागात राहणारा सुन्नी मुस्लिम समाज. त्यातच त्यालाच सीमा लागून असलेला इजराईल. केवळ सीमारेषेवरुन वाद निर्माण झाला. मग १९६७ चं युद्ध झालं. ज्यात इजराईल जिंकला. ज्यात गाजाची भुमी ज्यांच्याकडे होती. त्या फिलीस्तानीचं नुकसान झालं. त्यातील काही भुमी ही इजराईलला मिळाली. आता साहजीक आहे. आज जी आपली जागा बळजबरीनं कोणी घेतली तर ती आपण वा आपले वंशज कालांतरानं परत मिळवतोच. शिवाय इजराईल मधील सत्ताधीश गाजाच्या नियंत्रण सीमेचे नियम न पाळता हळूहळू आपल्या देशातील जागेचा विस्तार करण्यासाठी आपला भुभाग वाढवतात. ज्यातून संघर्ष चालतो. मग काय, फिलिस्तानी देशाला इजराईल मुळात संपवायचाय. ते काय करतील? त्यांनी भुयारं खोदली. जी इजराईलच्या भुमीत उघडतात. त्यातच आक्रमण होतं, साधंसुधं नाही, बॉंबस्फोटाचं. ज्यातून इजराईलची लोकं मरण पावतात. दुसरीकडं इजराईलला मदत करणारा अमेरिका. तो इजराईलला मिटू देत नाही. कारण त्यानंच त्याला जन्म दिला. मग तो कसा काय इजराईलला मिटू देणार? तो प्रत्येकवेळी मदत करतो इजराईलला. यातूनच संघर्ष निर्माण झाला इजराईल आणि इराण. कारण गाजामध्ये इराणच्या धर्माचे लोकं असून ते धार्मिकतेचे तत्व पाळणारे आहेत. इजराईल गाजाची भुमी वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण त्यांच्या धर्माची झळ गाजा भागातील जेरुसलेम आहे. जे येशूचं जन्मस्थळ आहे. विशेष सांगायचं झाल्यास इराण हा जास्त श्रीमंत देश नाही. मात्र अमेरिका जास्त श्रीमंत देश आहे. तसा इजराईलही तेवढा श्रीमंत देश नाही. परंतु श्रीमंत असलेल्या अमेरिकेचं पाठबळ आहे त्याला. परंतु इराण दिमाखानं खेळतोय. त्यांनी गाजात मोठमोठी भुयारं बनवली व ते भुयारात राहतात. जर गाजात हमला झालाच आणि घरही पडलं तरी ते जीवंत राहावे. यासाठीच तो उपाय. तसं पाहिल्यास तिकडच्या भागातील बरीच मंडळी भुयारातच राहाणं पसंत करतात. हमासचे बरेचसे आतंकवादी भुयारातच राहतात आणि त्या भुयारी जागेत इजराईल किंवा अमेरिकेचा ताबा नसल्यानं ती भुयारं दिसत नाहीत.
सध्याची स्थिती अशी की इराण आणि इजराईल संघर्षात अमेरिका शिरल्यानंतर अमेरिका श्रीमंत देश असल्यानं इराणवर हमले करतो व त्या हमल्यात कितीतरी करोड रुपयाची क्षेपणास्त्र इराण भुमीत पाठवतो आणि इराण त्यावर मात करण्यासाठी कमीतकमी पैशाचे द्रोण पाठवून ती क्षेपणास्त्र नेस्तनाबूत करतो. आता पाहूया की हा इजराईल निर्मितीपासून निर्माण झालेला संघर्ष केव्हा थांबतोय ते? कारण इराणही पावलं मागं घ्यायला तयार नाही व अमेरिकाही आपली पावलं मागं घेत नाहीत.
म्हणतात की अमेरिका हा श्रीमंत देश आहे. तशी जाहिरातच केली अमेरिकेनं. परंतु सध्याची परिस्थिती पाहता अमेरिकेतही भरपूर मंडळी गरीब आहेत. परंतु ते त्याकडे लक्ष देत नाहीत व आपणच जगात श्रीमंत आहोत हे दाखवतात. त्याचं कारण आहे, अमेरिकेचं जागतिक राजकारणात, जागतिक पातळीवर महासत्ता बनणं व ही महासत्ता टिकवून ठेवणं. त्यासाठीच त्यांनी जगात अनेक ठिकाणी अनेक जागेवर लष्करी स्थळ निर्माण केलीय. त्याला आपला दबदबा कायम ठेवायचाय. म्हणूनच तो युद्धगुरुची भुमिका पार पाडतोय. कुरघोडी करतोय. कुरघोडीचं राजकारण करतोय. परंतु यात जीव जातोय सामान्य जनतेचा. ती जनता, ज्या जनतेचा एवढासाही दोष नाही.
महत्वपुर्ण बाब ही की युद्ध होवूच नये आणि युद्धजन्य परिस्थितीही निर्माण होवू नये. कारण युद्धात फार मोठी हानी होते. अनेक सैनिक, त्यांचा दोष नसतांना मारले जातात. त्यातच निरपराध लोकही. हे होवू नये म्हणून संघर्ष थांबायला हवा व युद्धविराम व्हायला हवं. हे तेवढंच खरं.
✍️ अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
0 टिप्पण्या