मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/03/2026 :
आपल्या जीवनात स्त्री व पुरुष यांचे स्थान समान असावे असे सर्वांना वाटते. प्रत्यक्ष असे घडते का? घडत असेल तर चांगलेच आहे अन् घडत नसेल तर घडावे ही अपेक्षा.
आज्जी, आत्या, आई, काकू, मामी, बहीण, वहिनी, नणंद, मुलगी, नात अशा अनेक नात्यात त्या आपल्या भोवती असतात. काही नाती अशी आहेत की तिथे मनात उगाचच आकस असतो, मोकळेपणाचे नाते नसते.
इथे बदल अपेक्षित आहे. कोणासाठी पैसे खर्च करूनच काही केले पाहिजे असे नाही. मायेने,आपुलकीने चौकशी केली, दमलीस का विचारले तरी बरे वाटते. महिला दिन किंवा वाढदिवसाला भेट वस्तू देऊन खुश करण्यापेक्षा रोज केलेली चौकशी जास्त भावते.
आजचा संकल्प
आपल्या नात्यातील, समाजातील स्त्रियांचा आदर करू. त्यांना आपलेपणाच्या भावनेने सर्वजण वागणूक देऊ व त्यांच्यामुळे घराला घरपण आहे हे लक्षात घेऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या