मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 10/03/2026 :

आपल्या सानिध्यात कोण येणार, आपले कोणाशी कसे संबंध असणार हे आपल्याला अगोदर माहीत नसते. कोणाचा भरपूर सहवास मिळतो तर कोणी अगदी अल्पकासाठी आपल्या सानिध्यात येतात.

आपल्या सभोवताली संपर्कात असलेल्या व्यक्तींशी आपण चांगले वागण्याचा प्रयत्न करायचा. विनाकारण कोणाशी वैर करायचे नाही किंवा मनातून आकस ठेवायचा नाही.

पण दुसरे लोक आपल्याशी तसेच वागतील याची खात्री नसते. त्यामुळे ते जरी वाईट वागले तरी आपण त्यांना वाईट बोलायचे नाही किंवा त्यांच्याबद्दल वाईट भावना ठेवायची नाही. इथे आपले संस्कार उपयोगी पडतात.

आजचा संकल्प

आपला स्वभाव असा ठेवू की समोरचा कितीही नकारात्मक भावनेने बोलत असला किंवा वागत असला तरी आपल्या स्वभावाने त्याला सकारात्मक वागायला भाग पाडू व संस्कारांची पेरणी करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या