⭕ ज्ञानदेवराव श्रीरंगराव मगर यांचा 5 मार्च रोजी दशक्रिया विधी

⭕ ज्ञानदेवराव श्रीरंगराव मगर यांचा 5 मार्च रोजी दशक्रिया विधी 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 02/03/2026 :

सुरवड (तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेचे संस्थापक चेअरमन ज्ञानदेवराव श्रीरंगराव मगर (वय 74 वर्षे) यांचे मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी अकस्मात निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय अशा विविध सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचा नावलौकिक असून पंचक्रोशी मध्ये ते "माऊली मामा" म्हणून प्रसिद्ध होत. अत्यंत निगर्वी, शांत, सुस्वाभावी, आणि मनमिळावू वृत्तीमुळे  जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा सतत उंचावलेली असत. त्यांच्या अकस्मात निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कै. ज्ञानदेवराव श्रीरंगराव मगर यांचा  दशक्रिया विधी 5 मार्च 2026 रोजी सकाळी निरा नरसिंहपुर येथे होणार आहे.

कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शंकरराव मगर यांचे ते धाकटे बंधू होत.

    " अत्यंत प्रभावी आणि प्रसन्न व्यक्तीमत्त्व असणारे, आमच्या पत्रकारितेबद्दल सदैव अभिमान बाळगणारे आमचे मित्र "माऊली मामा" यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त समजून दुःखाने मन सुन्न झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास सदगती लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना! माऊली मामांच्या कुटुंबियांच्या दुःखात साप्ताहिक अकलूज वैभव आणि  पाक्षिक वृत्त एकसत्ता सहभागी आहे" अशी प्रतिक्रिया नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी नवी दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी. चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धी प्रमुख, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, अकलूज यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या