सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जयोत्सव 2K26 अंतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जयोत्सव 2K26 अंतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धा  संपन्न   

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 03/03/2026 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जयोत्सव 2k26 अंतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धा महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. प्रवीण ढवळे यानी दिली.

दि. 25 फेब्रुवारी  2026 रोजी सकाळी 10:30 वाजता प्रमुख पाहुणे महाविद्यालयाच्या ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य वसंत जाधव  यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयीन समन्वयक, कार्यालयीन अधीक्षक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी  उपस्थित होते. 

सदरच्या मैदानी स्पर्धा 25 फेब्रुवारी  2026  ते  28 फेब्रुवारी  2026  या कालावधीमध्ये पार पडल्या.  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सदरच्या स्पर्धेमध्ये  इनडोअर गेम व आऊट डोअर गेम अशा 7 क्रीडा प्रकारांमध्ये एकूण ४५७ विद्यार्थ्यांनी  सहभाग नोंदविला. 

 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकासाबरोबर खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी असे अनेक उपक्रम महाविद्यालयात राबवले जातात असे प्राचार्यांनी सांगितले. क्रीडा समन्वयक म्हणून प्रा.शिवशरण व्हि.एच. तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या