श्रीराम नवमी आणि श्री साई प्राणप्रतिष्ठा 29 वा वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/03/2026 : श्री साईबाबा ट्रस्ट संग्रामनगर - अकलूज यांच्यावतीने श्रीराम नवमी आणि श्री साई प्राणप्रतिष्ठा 29 वा वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आले आहे. त्यामध्ये सकाळी 6 ते 8 या वेळेत श्रीमती पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील व सौ उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा होईल. सकाळी 8 ते 9 वा. यज्ञ प्रज्वलन, सकाळी 10 ते 11:30 सामुदायिक भजन (शिवशंभो भजनी मंडळ), "सहकार महर्षि" कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व सौ सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते दुपारी ठीक 12 वा. श्रीराम जन्मोत्सव व महाआरती होईल. या धार्मिक सोहळ्यास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम के इनामदार, कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, संग्रामसिंह मोहिते पाटील, ऋतुजादेवी मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील, श्रीराज माने पाटील, राजवर्धनीदेवी माने पाटील, संग्रामनगर ग्रामपंचायत सरपंच अजित विठ्ठल रेवंडे, उपसरपंच सुदेश बबन रासकर यांच्यासह सर्व आजी-माजी सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 12 ते 2 : 30 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजता खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील व सौ शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते आरती, सायंकाळी 5:30 ते 6:30 माळीनगर येथील ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ यांचे तर सायंकाळी 7:30 ते 8 :30 शंकरनगर येथील ओंकार महिला भजनी मंडळ यांचे भजन होईल. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, पंचायत समिती सदस्या सौ. वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील, नगराध्यक्षा रेश्मा अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील,सौ. देवन्यादेवी मोहिते पाटील, नगरसेवक क्रांतिसिंह माने पाटील, युगंधरादेवी माने पाटील, यांचे सह सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती श्री साईबाबा ट्रस्ट संग्रामनगर - अकलूज यांच्यावतीने देण्यात आली.

0 टिप्पण्या