🔰 महसूल विभागाकडून पुळुज व भाळवणी मंडळात 1505 दाखले सेवांचे वितरण : तहसीलदार लंगुटे 💢 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान

🔰 महसूल विभागाकडून पुळुज व भाळवणी मंडळात 1505 दाखले सेवांचे वितरण : तहसीलदार लंगुटे

💢 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान  

वृत्त एकसत्ता न्यूज 

पंढरपूर दि(14)- पंढरपूर महसूल विभागाशी संबंधित  नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे  राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत आज दिनांक 14 रोजी पंढरपूर तालुक्यातील पुळुज व भाळवणी या मंडळातून  1 हजार 505   विविध सेवा व  विविध दाखले देण्यात आले असल्याची माहित  तहसीलदार सचिन  लंगुटे यांनी  दिली.  


या अभियानातंर्गत पुळुज व भाळवणी येथील शिबिरात निकाली काढण्यात आलेले फेरफार 211, सातबारा मधील दुरुस्ती 44, डिजिटल सातबारा 288, 8 अ उतारे 196, विविध दाखले 562, प्रमाणपत्रे 418, एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकालात काढण्यात आलेले अर्ज 14, भूसंपादन प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेली प्रकरणे 10, सामाजिक योजना 23, शिधापत्रिका 133, कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व कृषी सिंचन योजना 54, आभा कार्ड एच.बी, तपासणी व औषधोपचार 79, ई- मोजणी फेरफार नकाशा 35,आदी सेवा व दाखले देण्यात आले. 

यामध्ये पुळुज मंडळातून 750 तर करकंब मंडळातून 755 असे एकूण 1 हजार 505 विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात आल्याचे तहसीलदार  सचिन  लंगुटे यांनी  सांगितले.

यानंतर शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी खर्डी, पटवर्धन कुरोली, शुक्रवार दि. 17 एप्रिल रोजी भंडीशेगाव, रोपळे  शुक्रवार दि. 8 मे रोजी पंढरपूर तर शुक्रवार दि. 15 मे रोजी तुंगत चळे या मंडळात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी पंढरपूर तालुक्यातील संबधीत मंडळातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महाराजस्व समाधान शिबिर मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार  लंगुटे यांनी केले आहे.

यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, नायब तहसीलदार वैभव बुचके, दीपक शिंदे, दुय्यम निबंधक निराळी, निमसडे, मंडळ अधिकारी संतोष सुरवसे पुळुज, गणेश साठे भाळवणी आदीसह तलाठी, ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या