“नळाला 15 दिवसांनी पाणी तरीही हजारॊ रुपयांची सक्तीची पाणीपट्टी वसूली"
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 04 मार्च 2026 :
“ नळाला 15 दिवसांनी गटरगंगा पाणी आणि सालाबाद प्रमाणे हजारॊ रुपये रुपयांची पाणीपट्टी मालमत्ता धारकांकडून सक्तीने वसूल केली जाते… शेवगावकरांचा हा कोणता न्याय?” असा प्रश्न शेवगांव येथील सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार अविनाश देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की मार्च च्या पहिल्या आठवड्यात कडक उन्हाळ्याची चाहूल लागताच शेवगावकरांना १५ दिवसातून फक्त 1 वेळा पाणीपुरवठा!
आणि तेही इतकं घाण, दुर्गंधीयुक्त पाणी की ते पिणं म्हणजे आजारांना आमंत्रण!
ही परिस्थिती एखाद्या दुर्गम खेड्यातली नाही. ही परिस्थिती आपल्या शेवगाव शहराची आहे. फिल्टर यंत्रणा 35 वर्षांपूर्वीची. देखभाल नाही, सुधारणा नाही, आधुनिक यंत्रणा नाही. मात्र नगरपरिषद शेवगांव कडून पाणीपट्टी वसुलीसाठी सक्ती मार्च एन्ड च्या नोटिसा आणि कारवाई ??? मुख्याधिकारी नगरपरिषद असो किंवा संबंधित पाणीपुरवठा विभाग पालिकेच्या ईतर विभागातील कामाची तत्परता हि एकदम जोरात असते. { अतिक्रमणा चा अहवाल असो किंवा एखाद्या बांधकामासाठी परवानगी असो तातडीने निर्णय घेतले जातात.} मग नागरिकांच्या सर्वात महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्ना बाबत व आरोग्याच्या बाबतीत इतकी उदासीनता का ?? शहरातील लहान बालकांपासून पासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे नागरिक हेच गाळमिश्रित गढुळ, मळी मिश्रित पाणी पितात. { खंडोबामाळाच्या जलशुद्धीकरण केंद्रावर तुरटी क्लोरोफार्म व ईतर शुद्धीकरणाचे केमिकल्स योग्य प्रमाणात न वापरल्या मुळे } त्यातून होणारे साथीचे गंभीर आजार दवाखान्याचे खर्च शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक त्रास या सर्वांची जबाबदारी कोण घेणार?
नव्या सभागृहात नगरसेवक नवीन निवडून आले पद वाटपासाठी एकमत होते, निधीसाठी एकमत होते…पण जनतेच्या पाण्याच्या प्रश्नावर एकही आवाज का उठत नाही? लोकांनी तुम्हाला निवडून दिलं ते पदासाठी नाही. तर त्यांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी! उद्या एखादी मोठी साथ आली, एखाद्या निरपराध जीवाला किंमत मोजावी लागली, तर त्याची नैतिक जबाबदारी कोण घेणार?शहरवासीयांना स्वच्छ पाणी हवं आहे. हा शेवगावकरांचा हक्क आहे. कोणी गावपुढारी त्यांच्यावर उपकार करत नाहीत. या गंभीर प्रश्नावर शेवगाव नगरपरिषदेनं तात्काळ खंडोबामालावरील शुद्धीकरण यंत्रणा आधुनिक करावी पाण्याची नियमित तपासणी अहवाल जाहीर करावा दररोज पाणीपुरवठा सुरू करावा जनतेला पारदर्शक माहिती द्यावी
जनतेच्या आरोग्याशी आरोग्याशी खेळ करणाऱ्याचे काम थांबवा हा प्रश्न गलिच्छ राजकारण राजकारणा करण्याचा नाही एकमेकांची जिरवा जिरवी आणि मेरा कफन तेरे कफन से बडा कैसा या वृत्तीतून बाहेर येऊन आहे त्या जुन्या योजनेतुन उन्हाळ्यात शेवगावकरांना पाणीटंचाईचा सामना आणि खराब पाणी पुरवठा होणार नाही याची काळजी घ्यावी घ्यावी. [ निवडुन येण्यासाठी मोठमोठी आंदोलने करणारे पाण्यासाठी हंडा मोर्चा, दांडा मोर्चा रास्ता रोको करणारे ] नगरपालिकेत सगळेच सत्तेत आहेत. हार, तुरे, सत्कार, मुंबई वाऱ्या करून झाल्या असल्या तर शहर वासियांच्या मूळ प्रश्नांकडे लक्ष देणार का ???
ताजा कलम
या गंभीर प्रश्नावर जेव्हा एखादि सामाजिक संघटना किंवा कार्यकर्ता आवाज उठवतो तेव्हा सो कॉल्ड गावपुढारी त्याच्या हेतुवरच शंका घेतात. आणि त्याच्या बाबत अफवा आणि बदनामीचे आरोप केले जातात. आर्थिक तडजोडीसाठी करतोय असं पाठीमागं बोललं जात हा मुद्दा कोणत्याही गलिच्छ राजकारणाचा नाही. हा मुद्दा जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि सार्वजनिक आरोग्याचा आहे. "आडवा आडवी आणि जिरवा जिरवी" संपली असेल तर "सत्तेत असलेल्या आणि विरोधात नसलेल्या सर्वच नगरसेवकांनी" रखडलेली नवी पाणी योजना आणि नादुरुस्त जुनी पाणी योजना यात लक्ष घालून लोकांना भर उन्हाळ्यात आठ दिवसाला पाणी दिले पाहिजे नाहीतर पदाचे राजीनामे दया आणि मोकळे व्हा ????
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 9270442511
क्रमशः
जलशुद्धीकरण केंद्रावर जलशुद्धीकरण करणारी ठेकेदार कंपनी पिवळं पाणी का येतंय याचा शोध घेणार का ???
======================


0 टिप्पण्या