पंढरपूरात 14 मार्चला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
पंढरपूर दि(12)- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून पंढपूरात दि.14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश ओं. रा. देशमुख यांनी केले आहे.
या लोकअदालतीमध्ये फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, बँक वसुली, कलम 138 एनआय अॅक्टची प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, वैवाहीक वादाबाबतची प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. तसेच भूसंपान बाबतची प्रकरणे, बँक, सहकारी बँक, सहकारी पतसंस्था यांच्या वसुलीच्या दरखास्त, बँक लवाद दरखास्त इत्यादी (प्रलंबित व दाखलपूर्व) प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. या लोकअदालतीमध्ये नगरपालिका यांच्या कर आकारणी व गाळेधारक यांची प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीमधील घरपट्टी व पाणीपट्टी यांच्या थकीत बिलाची दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहे.
ज्या पक्षकारांना लोकअदालतमध्ये प्रत्यक्षरीत्या सहभागी होता येणार नाही त्यांच्यासाठी आभासी पध्दतीने उपस्थिती राहण्याकरीता ऑनलाईन माध्यमाचा वापर केला जाणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पंढरपूर तालुक्यातील जास्तीत जास्त पक्षकारांनी आपापली प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावेत, असे आवाहनही तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश ओं. रा. देशमुख यांनी केले आहे.
000000000

0 टिप्पण्या