🔰 महसूल विभागाशी संबंधित कामे जलदगीने सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन - तहसिलदार सचिन लंगुटे 💢 तालुक्यातील 12 मंडळामध्ये 7 मार्च ते 15 मे कालावधीत होणार अभियान’

 🔰 महसूल विभागाशी संबंधित कामे जलदगीने सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे  आयोजन - तहसिलदार सचिन लंगुटे

    💢 तालुक्यातील 12 मंडळामध्ये 7 मार्च ते 15 मे कालावधीत  होणार  अभियान’

वृत्त एकसत्ता न्यूज 

पंढरपूर दि(02)-  तालुक्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित कामे  जलदगतीने सोडविण्यासाठी पंढरपूर  तालुक्यातील 12 मंडळामध्ये दि. 7 मार्च ते 15 मे या कालावधीत  ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार  सचिन लंगुटे यांनी दिली. 

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी हे महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियान  मोहिमेत विविध विभागाचे  अधिकारी  गावपातळीवर उपस्थित राहून  नागरिकांच्या प्रलंबित कामांचा  तात्काळ  निपटारा करण्यात येणार आहे.  शनिवार दि. 07 मार्चला कासेगांव, करकंब, 14 मार्चला भाळवणी, पुळुज शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी खर्डी, पटवर्धन कुरोली, शुक्रवार दि. 17 एप्रिल रोजी भंडीशेगाव, रोपळे  शुक्रवार दि. 8 मे रोजी पंढरपूर तर शुक्रवार दि. 15 मे रोजी तुंगत चळे या मंडळात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे 

या शिबिरा अंतर्गत प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायदा, अकृषिक तरतुदी संदर्भातील सुधारणाबाबत मार्गदर्शन, भूसंपादन केलेल्या व अकृषीक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करणे, सुधारणा व नागरिकायदा त्याचबरोबर उत्पन्न, रहिवासी, अधिवास, जात व नॉन क्रिमीलेअर दाखले यांच्याबाबत तात्काळ सेवा दिली जाणार आहे. तरी पंढरपूर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महाराजस्व समाधान शिबिर मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार श्री. लंगुटे यांनी केले आहे.

000000000

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या