जिल्हा परिषद सदस्य कांता वाटेगावकर, संताजी मेटकरी यांचा यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने सत्कार

जिल्हा परिषद सदस्य कांता वाटेगावकर, संताजी मेटकरी यांचा यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने सत्कार 

वृत्त एकसत्ता न्यूज 

वाळवा  - सांगली जिल्हा परिषद  निवडणुकीत बापू बिरू वाटेगावकर यांच्या स्नुषा व शिवाजी वाटेगावकर (महाराज) यांच्या पत्नी सौ. कांता  वाटेगावकर या बोरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून व वाळवा जिल्हा परिषद मतदारसंघातून संताजी मेटकरी , तसेच उजाळाईवाडी(कोल्हापूर) पंचायत समिती गणातून डॉ.सौ. शिल्पा संदिप हजारे विजयी झाल्याबद्दल यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. 


  स्वर्गीय बापू बिरू वाटेगावकर यांच्या नावाचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रात असला तरीही त्यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर (महाराज) प्रगतशील शेतकरी असुन सामाजिक कार्यात सक्रिय असले तरीही  राजकारणात मात्र सक्रिय  नव्हते. परंतु नुकत्याच झालेल्या जि. प., प. स. निवडणुकीत लोकाग्रास्तव त्यांच्या पत्नी सौ. कांता शिवाजी वाटेगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि विजयी झाल्या.  यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, डॉ गोरड,  संपत रूपने , भरत नाईक, संजय काळे, दयानंद माने, पोपट सिसाळे, संदिप गावडे, अशोक विरकर, उत्तम तांदळे इत्यादी पदाधिकारी व मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या