मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/02/2026 :
आपण मंदिरात गेलो की मन शांत होते, प्रसन्न वाटते. नकारात्मक भाव जाऊन मनात सात्विक भाव येतात. आपोआप हात जोडले जातात. देवाची प्रसन्न भाव असलेली मूर्ती डोळे भरून पाहतो व न कळत डोळे मिटून ती मनामध्ये जपून ठेवतो.
देवाकडे आपलेपणाने पाहण्याचा, देवाला समजून घेण्याचा, त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा हा परिणाम असतो. असाच विश्वास ठेवण्यासारखी देवमाणसे आपल्या सहवासात आली तर?
देवापुढे जे हात जोडतो, त्या हातांना सत्कर्म करू, मदतीचा हात देऊ. ज्या मुखाने देवाचे स्तोत्र आळवतो त्या मधून चांगलेच बोलू. समोरच्या व्यक्तीत देव पाहू, आदरभाव ठेवू. किती साध्या गोष्टी असतात पण आपल्या अहंकारपायी आपण आपल्यातील देवपण सुद्धा विसरून जातो.
आजचा संकल्प
प्रत्येक माणसात चांगले-वाईट गुण असतात. कोणीच पूर्णपणे सद्गुणी किंवा दुर्गुणी नसतो. आपल्यातील दुर्गुण कमी करू व सदगुण वाढवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या