मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/02/2026 :
एखाद्या गोष्टीची जाणीव ठेवणे फार महत्वाचे असते. अनेकदा असे होते की आपले अडचणीचे वा दुःखाचे दिवस आपण आठवत राहतो आणि वर्तमानातील सुखापासून पारखे होतो.
याउलट काहीजण झाले गेले विसरून आहे या परिस्थितीचा आनंद लुटतात. पूर्वी एखादी गोष्ट मिळाली नसेल तर वर्तमानात त्याची लयलूट करतात. भरपूर खरेदी करतात, भरपूर पैसे खर्च करतात व जे दुःख भोगले त्याची भरपाई करतात.
खरे तर याचा सुवर्णमध्य साधला पाहिजे. जुने उगाळत न बसता त्या दिवसांची जाणीव ठेवली पाहिजे. जे सध्या त्या परिस्थितीत आहेत त्यांची मानसिकता समजून घेऊन त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे.
आजचा संकल्प
आयुष्यात उपभोगलेल्या वाईट दिवसांची जाणीव ठेवून सद्य परिस्थितीत आनंदात राहू व जमेल तसा इतरांना आर्थिक, मानसिक, भावनिक दिलासा देऊन जगण्याची उभारी देऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या