सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये निवड

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये निवड

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 13/02/2026 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या “डॅनफॉस पावर सोल्युशन्स पुणे” या नामांकित कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला  होता. त्यामध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पदवी मेकॅनिकाल विभागामध्ये अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या चि.अजय रिसवडकर, चि. रुद्रतेज माने देश्मुख, चि. विकास पवार, चि.ज्ञानदेव देवकुळे व कु.ऐश्वर्या कणसे या विद्यार्थ्यांची “डॅनफॉस पावर सोल्युशन्स पुणे” या नामांकित कंपनी मध्ये निवड झाली आहे. तसेच सदर कंपनी बरोबर प्लेसमेंट व इंडस्ट्रियल ट्रेनिंग या संदर्भात सामंजस्य करार झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष  जयसिंह शंकरराव मोहिते पाटील,  महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, यांनी अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. 

या प्रक्रियेमध्ये मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख देशपांडे जि.जि. व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संगीतराव पी. वाय. यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या