विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/02/2026 :
आपण शालेय विषय शिकत असताना, एखादा विषय जास्त आवडतो तर एखादा बिलकुलच आवडत नाही. आवडणारा विषय आपण सारखा अभ्यासाला घेतो अन् न आवडणाऱ्या विषयाचा तास सुद्धा आवडत नाही.
असे का होते? जे विषय सोपे जातात ते काहीना आवडतात. ज्यांना भाषा विषयात गोडी असते ते जरा गणिताला घाबरतात. याविरुद्ध गणित, शास्त्र आवडीने करणाऱ्या विद्यार्थ्यांना भाषा विषय आवडत नाहीत.
मुलांनो, अभ्यासात आवड-नावड नको. नेमून दिलेले जे विषय अभ्यासक्रमात आहेत त्या सगळ्यांचा आवडीने अभ्यास करायचा. आवडत नाही वाटणारा जो विषय असेल त्याला जरा जास्त वेळ द्यायचा. त्यामध्ये गोडी वाटेल अशा पद्धतीने अभ्यास करायचा.
अवघड ते सोपे करून सर्व विषयांना समान वेळ देऊन आवडीने अभ्यास करू व यशस्वी होऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या