दिग्गज साहित्यिकांचा 'सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील' पुरस्काराने गौरव

दिग्गज साहित्यिकांचा 'सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील' पुरस्काराने गौरव

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 23/02/2026 :

श्री विजय गणेश उत्सव मंडळ आणि मराठी साहित्य परिषद शाखा, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साहित्यिक पुरस्कार’ वितरण सोहळा सोमवारी अत्यंत उत्साहात पार पडला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते साहित्यातील दिग्गज मानकर्‍यांना सन्मानित करण्यात आले.

शंकरनगर येथील उदय सभागृहात सकाळी १० वाजता हा सोहळा संपन्न झाला. यावेळी अकलूज परिसरातील साहित्यप्रेमी, वाचक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.

यावर्षीचा मानाचा पुरस्कार खालील मान्यवरांना देऊन गौरविण्यात आले.

१. डॉ. जयसिंगराव पवार (ज्येष्ठ इतिहास संशोधक): इतिहास संशोधनातील त्यांच्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या भाचीने स्वीकारला.

२. डॉ. सदानंद देशमुख (प्रसिद्ध साहित्यिक): 'बारोमास' फेम साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाचा यावेळी गौरव करण्यात आला.

३. नारायण सुमंत (कवी व लेखक): त्यांच्या काव्यसंग्रह आणि लेखणीचा सन्मान यावेळी करण्यात आला.

पुरस्काराला उत्तर देताना मान्यवरांनी सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या कार्याचे स्मरण केले आणि ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळीचे कौतुक केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु स्वरूपाराणी मोहिते पाटील संचालिका शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांनी केले. 

सुत्रसंचालन व आभार प्रा. रोहित देशमुख व प्रा विनायक सुर्यवंशी यांनी केले. 

कार्यक्रमाचे संयोजन / आयोजन श्री विजय गणेश उत्सव मंडळ व मराठी साहित्य परिषद, अकलूज यांच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत नेटकेपणाने केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या