मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/02/2026 :
जीवनात आपला जेव्हा इतरांशी संबंध येतो तेव्हा संवाद साधला जातो. कधी तो सुसंवाद असतो तर कधी विसंवाद. कोणी वाद घालतात तर कोणी उलट परीक्षा घेतात.
अशावेळेस शांत राहणे जास्त योग्य ठरते. डोके स्थिर ठेवून वागणे-बोलणे असेल तर संभाषण व्यवस्थित होऊ शकते. कोणाशी ईर्ष्या किंवा बरोबरी न करणे योग्य. त्यापेक्षा मिळून मिसळून वागणे व एकीने राहणे कधीही योग्य.
आपली असलेली परिस्थिती समाधानाने स्वीकारण्याची मानसिकता जर असेल तर आपण कोणाची बरोबरी करत नाही. त्यामुळे इतर वाद विवाद होण्याची किंवा मानसिक संघर्ष होण्याची शक्यता नसते.
आजचा संकल्प
कोणाला कमी न लेखता, कोणाच्या पुढे जाण्याची अपेक्षा न करता, स्वतःला कमी न लेखता सम भावनेने राहू व जीवनाचा आनंद लुटू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या