मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/02/2026 :
आपल्या विचारांवर विजय मिळवायचा असेल, विचार आचरणात आणायचे असतील तर भावना आवरता आल्या पाहिजेत. भावना अनावर झाल्या किंवा वरचढ झाल्या तर घेतलेले निर्णय बारगळू शकतात.
आपले अनेकदा असे होते की आपण बरेच काही करायचे ठरवतो, संकल्प करतो मात्र प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेंव्हा कंटाळा आलेला असतो. करू नंतर, करू उद्या यामध्ये कदाचित ते राहूनही जाते.
यासाठी गरज असते भावनांवर नियंत्रण ठेवण्याची. कोणीतरी आपल्यावर वर्चस्व असणारा ज्याचे म्हणणे आपण टाळू शकत नाही. भले ती व्यक्ती वयाने बरोबरीची किंवा लहान असली तरी त्यामध्ये एक आदरयुक्त धाक हवा.
आजचा संकल्प
अर्जुनाला त्याचा मित्र असूनही गुरू ठिकाणी असणाऱ्या श्रीकृष्णाने भावना आवरायला लावल्या तशीच आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारी एखादी व्यक्ती आपण गुरुस्थानी ठेवू व कर्तव्ये पार पाडू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या