मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/02/2026 :
आपल्या प्रत्येकाला वेळेचे महत्व समजतेच असे नाही मात्र ते समजले पाहिजे हे नक्की. प्रत्येक वेळेस घड्याळाच्या काट्यावर धावले पाहिजे असे नाही पण २४ तासांचे व्यवस्थित नियोजन हवे.
अभ्यास, नोकरी, व्यवसाय यामध्ये यशस्वी व्हायचे असते तरी सुद्धा कुटुंब, मित्र, छंद, व्यायाम, मनोरंजनासाठी ठराविक वेळ राखून ठेवलाच पाहिजे. रेसच्या घोड्याप्रमाणे नुसते एकाच गोष्टीमागे धावणे कधीच योग्य नाही.
कुटुंबात गरजेच्या वेळेस मुलांसाठी, मित्रांसाठी आपण वेळ दिला नाही तर आपल्या अडचणीत, वृद्धापकाळात, त्यांच्याकडून अपेक्षा करणे किती योग्य ठरेल? जवळच्या माणसांना असताना वेळ द्या नंतर पश्चात्ताप करून काय फायदा?
आजचा संकल्प
कोणत्यातरी एखाद्या गोष्टीला अती महत्व व वेळ देण्यापेक्षा हातात असलेल्या वेळेचे व्यवस्थित नियोजन करू व जीवनाचा आनंद घेऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या