शशिकांत कुलकर्णी यांना विश्व संस्कृती एवम पर्यावरण संरक्षण आयोग यांच्यातर्फे पीएचडी प्रदान

 

शशिकांत कुलकर्णी यांना विश्व संस्कृती एवम पर्यावरण संरक्षण आयोग यांच्यातर्फे पीएचडी प्रदान

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 26/02/2026 :

पुरंदावडे (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील शशिकांत पुरुषोत्तम कुलकर्णी यांना दिल्ली येथील विश्व संस्कृती एवम पर्यावरण संरक्षण आयोग यांच्यातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमा च्या प्रमुख अतिथी डॉक्टर ईशा अग्रवाल (मिस इंडिया 2015)  यांच्या हस्ते कुलकर्णी यांना पदवी प्रदान करण्यात आली. कुलकर्णी हे 36 वर्षापासून अकलूजच्या शिवरत्न शिक्षण संस्थेच्या शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज धवलनगर, यशवंतनगर येथे हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन हिंदी शिक्षक संघ सोलापूर यांचा हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे अतुल्य भारत पुरस्कार, बाँड समाज रत्न पुरस्कार, आदर्श रत्न सन्मान पुरस्कार, भारतरत्न सन्मान पुरस्कार, मुंशी प्रेमचंद विद्यावाचस्पती उपाधी, शिक्षक नायक सन्मान, युनिव्हर्सल ह्युमन डिग्ग्निटी अवॉर्ड, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय अवार्ड, रवींद्रनाथ टागोर राष्ट्रीय अवार्ड, मदर टेरेसा बुक ऑफ इंडिया प्राइड इंटरनॅशनल अवॉर्ड, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल प्राईड याची वर्स अवॉर्ड, महात्मा गांधी इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड, गौतम बुद्ध इंटरनॅशनल रिलीजन्स अवॉर्ड अशा प्रकारचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. हिंदीमध्ये लिखाण करून हिंदीचा प्रचार प्रसार केला आहे. हिंदी तज्ञ शिक्षक म्हणून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. अनेक विद्यालयामध्ये पर्यावरण व हिंदी विषय याविषयी व्याख्याने दिली आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. यापूर्वी त्यांना आदर्श हिंदी शिक्षक तसेच रोटरी क्लब चा राष्ट्र निर्माण पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या यशाबद्दल शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष  खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील, प्राचार्य अल्बर्ट थरकन, प्राचार्या बिनो के पावलस व जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड एस सी एस टी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एनयूबीसी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश  प्रसिद्धी व संपर्कप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या