विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 15/02/2026 :
आपण शाळेत जे विषय शिकतो त्यांच्याकडे फक्त परीक्षेपुरते न पाहता त्यामधून जीवनोपयोगी अनेक गोष्टी शिकता येतात. पाठ्यपुस्तकातील भाषा विषयांचे धडे आपल्याला जीवनात अंगीकारण्या सारखे अनेक धडे शिकवतात.
विज्ञानातून अंधश्रद्धा जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोन येतो. इतिहास प्रेरणा देतो, झालेल्या चुका, त्याचे परिणाम यामधून सावध बनवतो. जागेवर बसून भूगोल आपल्याला विश्वाचा परिचय करून देतो.
मुलांनो, दैनंदिन जीवनात कसे वागावे, सामाजिक मूल्ये कशी जपावीत हे नागरिकशास्त्र शिकवते. आपली राज्यघटना, हक्क-कर्तव्ये याचे ज्ञान नागरिकशास्त्रातून मिळते. म्हणून प्रत्येक विषय समजून घेऊन शिका.
विद्यार्थीदशेत घेतलेले ज्ञान म्हणजे आयुष्याची शिदोरी असते.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या