मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 15/02/2026 :
समाजात वावरताना आपल्याला अनेक बदल जाणवतात. अनेक जुन्या गोष्टी जाऊन तिथे नवीन आलेल्या असतात. जुन्या जरी सवयीच्या असल्या तरी नवीन पण आवडू लागतात.
आपल्या सवयी, आपले राहणीमान, आपले घर, घरातील वस्तू, कपडे बदलत राहते. न कळत आपण नव्याचा स्वीकार करतो. सुरुवातीला थोडे वेगळे वाटते पण हळूहळू सराव होतो.
असे असले तरी आपले संस्कार मात्र बदलू नका. पाश्चिमात्यांचे अनुकरण करताना त्यांचे संस्कारांचे पण अंधानुकरण करू नका. आपली संस्कृती, आपले रितीरिवाज व आपली मातृभाषा कधीच सोडू नका.
आजचा संकल्प
२१वे शतक आहे, संगणकाचे युग आहे, तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तरीसुद्धा या विकसित युगात वावरताना पुढील पिढीला आपले संस्कार देऊ व आपली संस्कृती टिकवून ठेवू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
===================

0 टिप्पण्या